Breaking News

खामगाव येथे दारू अड्ड्यावर रेड ; १५० लिटर हातभट्टी दारू जप्त

Raid on liquor den at Khamgaon; 150 liters of distillery liquor seized

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २७ जून - खामगाव ता. फलटण येथे बेकायदेशीर हातभट्टी दारूची विक्री चालू  असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी रेड टाकून सुमारे ३० हजार रुपये किंमतीची १५० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी  दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनवरुन मिळालेल्या माहितीनुसार  महिला पोलीस उपनिरीक्षक धोंगडे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे खामगाव ता. फलटण गावचे हददीत साखरवाडी ते मुरुम जाणारे एका घराच्या रोडलगत देशी गावठी काढीव हातभट्टी दारुची बेकायदेशीरपणे विक्री चालु आहे. पोलीस उपनिरीक्षक धोंगडे व साखरवाडी पोलीस चौकीतील पोलीस हवालदार मोहन हांगे, पोलीस कॉन्स्टेबल खरात यांनी दि. २२ जून रोजी समक्ष जावुन पहिले असता, रस्त्याचे बाजुस एका घराचे आडोशाला एक व्यक्ती पिवळा कॅन घेवून बसलेला दिसला, त्यास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव संदिप केज राठोड ( वय २५ वर्षे सध्या रा. खामगाव ता. फलटण मुळ रा. जुनी जेजुरी दत्तमंदिराचे पाठीमागे ता. पुरंदर जि. पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याचे कब्जातून १५० लिटर काढीव हातभट्टी त्याची किंमत ३० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची हातभट्टीची दारु जागेवरच नष्ट करण्यात आली आहे.

No comments