Breaking News

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पी.ओ.पी.)मुर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई

Prohibition of making and selling plaster of Paris (POP) sculptures

      सातारा दि. 27 : सातारा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील  जल आणि वायु प्रदुषणामध्ये वाढ होऊ नये याकरिता उपाययोजना करणे गरजेचे असल्याने पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या वापरामुळे निसर्गामध्ये होणारे प्रदुषण आणि पर्यावरणामध्ये होणारे बदल व त्यापासून होणारा भविष्यातील धोका विचारात घेऊन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मूर्ती उत्पादन, वितरण व विक्री रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार प्रतिबंध करण्यात येत असल्याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत

     सातारा जिल्ह्यामध्ये पी.ओ.पी.  (प्लास्टर ऑफ पॅरीस) पासून बनविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मुर्ती उत्पादन, वितरण व खेरदी-विक्री करण्यावर दि. 6 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात येत आहे. ज्या मुर्तीकारांकडे पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मुर्ती असतील त्यांना दि. 5 जुलै 2022 पर्यंत त्याची विक्री करण्याची मुभा देण्यात येत आहे. पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती बनविण्यास, वितरण करण्यास, आयात करण्यास दि. 6 जुलै 2022 पासून प्रतिबंध करण्यात येत असल्यामुळे यानंतर पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती आढळून आल्यास मुर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडनीय कारवाई करण्यात येईल. पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व  प्रकारच्या मुर्ती तयार करणाऱ्या, विक्री करणाऱ्यास तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

      या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने  तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याकरिता स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पदाधिकारी (नगरपालिका व ग्रामपंचायत) पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत उप-प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ सातारा आणि पर्यावरण विषयक कामकाज करणाऱ्या संस्थाचे प्रतिनिधी यांच्या पथकाची निर्मिती केली आहे.

No comments