Breaking News

मंत्रिमंडळ निर्णय - औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव

Cabinet decision - Aurangabad's name is Sambhajinagar, Osmanabad's name is Dharashiv

    मंत्रिमंडळ निर्णय दि. २९ जून २०२२ - औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

    हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.

No comments