मलठण, फलटण येथे चोरी ; ४ मोबाईल व रोख रक्कम लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - गरमीने उकडत असल्याने, मलठण, फलटण येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी झोपताना रूमचा दरवाजा नुसता लोटून घेतला होता. मात्र ही संधी साधत अज्ञात चोरट्याने रूम मधून विद्यार्थ्यांचे ४ मोबाइल, एटीएम कार्ड, रोख रक्कम व कागदपत्रे असा एकूण ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे.
अधिक माहिती अशी, अॅग्रीकल्चर कॉलेजचे विद्यार्थी महतपुरापेठ संतोषीमाता कमान, मलठण, फलटण येथे भाड्याने रूम घेऊन राहतात. विद्यार्थ्यांनी दि. १८ मे रोजी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला व उकाडा असल्यामुळे रूमचा दरवाजा न लावता झोपी गेले. मात्र चोरट्यांनी हीच संधी साधून, रात्री १२:३० ते २:३० वाजण्याच्या दरम्यान रूम मध्ये प्रवेश करून, प्रतिक सुभाष होले याचा विवो कंपनीचा मोबाईल (किंमत ५०००), अभिषेक हरिदास गदादे याचा रेडमी नोट ९ कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल (किंमत ५०००), अक्षय हेमंत ढमाळ याचा ओपो एफ १९ प्रोप्लस कंपनीचा मोबाईल (किंमत १००००), आकाश दिनानाथ बेलदार याचा विवो वाय ५० कंपनीचा मोबाईल (किंमत ५०००), राजेंद्र बाळासो ढमाळ याचे एटीएम व ५ हजार रुपयांच्या चलनी नोटा व इतर कागदपत्राचे असा एकूण ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद प्रतिक सुभाष होले मुळ रा. बेटवाडी ता. दौड जि पुणे सध्या रा. महतपुरापेठ संतोषीमाता कमान मलठण फलटण याने दिली आहे.
No comments