Breaking News

खेळामुळे शरीर सदृढ होते, मन खंबीर बनते आणि मन खंबीर झाल्याने अभ्यास उत्तम होतो - महेश खुटाळे

Sports strengthens the body, strengthens the mind and strengthens the mind makes study better - Mahesh Khutale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाला महत्त्व दिले पाहिजे असे सांगून खेळामुळे शरीर सदृढ होते व शरीर सुदृढ असल्याने मन खंबीर बनते आणि मन खंबीर झाल्याने अभ्यास उत्तम होत असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी आणि महाराष्ट्र हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांनी केले आहे.

    ईश्वर कृपा शिक्षण संस्था संचलित  ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे, ता. फलटण या विद्यालयात गुरुवार दि. ५ मे पासून समर कँपला उत्साहात सुरुवात झाली. या समर कॅम्पचे उदघाटन प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी व महाराष्ट्र राज्य हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, प्राचार्य गिरिधर गावडे, प्रशिक्षक तेजस फाळके, चक्रधर जाधव, सुजाता पोमणे, रमेश सस्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

    खेळाबरोबर शिस्तही महत्त्वाची आहे, शिस्तीनेच राष्ट्र मोठे होते, नियमीत व्यायाम व शिस्तीचे पालन करावे असे सांगून विद्यार्थ्यांना खेळाविषयी अनेक प्रश्न विचारुन बोलते करीत महेश खुटाळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

    प्राचार्य श्री गिरिधर गावडे सर यांनी आपल्या मनोगतात चालू वर्षी चा समर कॅम्प संस्थेच्या सचिव सौ साधनाताई गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून पालकांनी ही पहिल्या वर्षी मुलांना सहभागी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. फलटण तालुका क्रीडा अधिकारी व महाराष्ट्र राज्य हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे यांच्या कार्याचा मुलांना परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री रमेश सस्ते सर यांनी केले.

No comments