Breaking News

सातारा जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित विभगाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी सिद्धार्थ दैठणकर यांची फेरनिवड

Re-election of Siddharth Daithankar as District Vice President of Satara District Congress Scheduled Castes

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित विभाग माजी अध्यक्ष मनोजकुमार तपासे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर, सातारा जिल्हा अनुसूचित विभाग जिल्हा व तालुका अध्यक्ष व कार्यकारणी बरखास्त करून, नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संजय तडाके यांची जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. तर फलटण येथील सिद्धार्थ दैठणकर यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली.

      सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात  डॉ. सुरेश जाधव जिल्हाध्यक्ष, भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग यांच्या हस्ते मावळते अध्यक्ष तपासे व सिद्धार्थ दैठणकर यांचा गौरव सत्कार करण्यात आला व नवीन जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदभार देण्यात आला.  याप्रसंगी सिद्धार्थ दैठणकर यांची जिल्हाउपाध्यक्ष फेरनिवड करून, भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग व सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते फेरनियुक्ती पत्र देण्यात आले.

No comments