मराठी राजभाषा दिनानिमित्त फलटण ग्रंथ प्रदर्शन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -: मराठी राजभाषा दिनानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत महाराणी साहेब लक्ष्मीदेवी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस, फलटण येथे आयोजित केले ग्रंथ प्रदर्शन हे दि. १ मार्च ते ५ मार्च दरम्यान सुरु राहणार असल्याची माहिती ग्रंथप्रदर्शन आयोजक व ग्रंथपाल प्रा. महेश डांगे सर यांनी दिली.
आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त श्रीमंत महाराणी साहेब लक्ष्मीदेवी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस, फलटण ग्रंथालय विभाग येथे दि. १ ते ५ मार्च दरम्यान दररोज सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ग्रंथ प्रदर्शनामध्ये कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या कवितांची पुस्तके तसेच इतर लेखकांनी लिहलेल्या कादंबरी, कविता, स्पर्धापरीक्षा, धार्मिक विषयक व इतर वाचन साहित्य ठेवण्यात येत आहे.
या ग्रंथ प्रदर्शनास वाचन प्रेमी, कवी, लेखक, शालेय व महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी बहुसंख्येने भेट देवून या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथप्रदर्शन आयोजक व ग्रंथपाल प्रा. महेश डांगे सर यांनी केले आहे.
No comments