Breaking News

दिगंबर आगवणे यांचे आमरण उपोषण सुरू ; फसवणूक केलीय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा - आगवणे

उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याशी चर्चा करताना दिगंबर आगवणे 
Digambar Aagawane's fast unto death begins ; File charges against those who have committed fraud - Digambar Aagawane

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ मार्च -  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व स्वराज साखर कारखाना संचालक मंडळाने तसेच स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने वेळोवेळी माझी फसवणूक केली आहे, तरी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी, दिगंबर आगवणे यांनी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे केली. दरम्यान दिगंबर आगवणे यांनी आज  दि. २३ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे भीक मागो आंदोलन केले त्यानंतर ते प्रांत कार्यालय फलटण येथे येऊन प्रांताधिकारी यांची भेट घेतली. त्यानंतर   फलटण प्रांत कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले. 

दिगंबर आगवणे यांनी आज  नाना पाटील चौक येथून भीक मागो आंदोलनाला सुरवात केली. परंतु पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी, आगवणे यांना भीक मागो आंदोलन करण्यापासून परावृत्त केले.  त्यानंतर नाना पाटील चौक येथून आयडीबीआय बँक येथे दिगंबर आगवणे गेले. व शाखा अधिकारी यांची भेट घेऊन कर्ज खात्याच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यांनंतर महात्मा फुले चौक मार्गे प्रांताधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांची भेट घेतली. 

स्वराज कारखान्याकडून बगॅस, प्रेसमड, फर्टिलायझर, साखर या मालांची खोटी बिले माझ्या अकाउंटला मारली आहेत. व त्याद्वारे माझी फसवणूक केली आहे. उपवळे येथील गट नं १२१ मधील जमिनीमध्येही मोठा घोळ असून, यामध्ये शासनाची फसवणूक झाली असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या निदर्शनास आणून देऊन  संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिगंबर आगवणे यांनी केली.

No comments