Breaking News

१ कि.मी. पोहता येणाऱ्या १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

Appeal for candidates between 18 to 35 years of age who can swim 1 km

    सातारा दि. 3 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत पॉवर बोट व जेट स्की या साहसी खेळाचा प्रशिक्षण कार्यक्रम मौजे तारकर्ली जि. सिंधुदूर्ग या ठिकाणी आयोजित केला आहे. सातारा जिल्ह्यातील 18 ते 35 वर्षापर्यंतच्या तसेच किमान 1 कि. मी. पोहता येणाऱ्या उमेदवारांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निवड चाचणीकरिता आपले अर्ज दि. 10 मार्च 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल,सातारा येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.

     प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी कळविले आहे.

No comments