Breaking News

९ लाख ९४ हजरांचा गुटखा जप्त ; फलटण शहर पोलिसांची कामगिरी

9 lakh 94 thousand gutka seized; Performance of Phaltan city police

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ फेब्रुवारी -  दहिवडी बाजूकडून, फलटण बाजूकडे  प्रतिबंधित अन्नपदार्थ पिकअप गाडीतून येणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांना मिळाली. आणि पोलिसांनी त्या अनुषंगाने झिरपवाडी येथे नाकाबंदी करून, पिकअप गाडीस पकडले. यामध्ये  ९ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा ६८९ किलो गुटखा वाहतूक करताना सापडला असून, या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस निरीक्षक किंद्रे व त्यांचे पथकाने दहिवडीकडून फलटण बाजूकडे प्रतिबंधित अन्नपदार्थ पिकअप गाडीतून येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी झिरपवाडी येथे नाकाबंदी केली. व सदर वाहन झिरपवाडी ता. फलटण या गावच्या हद्दीत ताब्यात घेतले. सदर वाहन क्रमांक एम एच १२ क्यूजी १०४३ या वाहनाचे चालक नामे बाबू धुळा काळे , वय ३३ वर्षे रा. खैराव ता. जत जि सांगली यास ताब्यात घेण्यात आले.

    याबाबत अन्न औषध प्रशासन विभागास कळविण्यात आले, त्यानुसार दिनांक १ मार्च रोजी अन्न औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे यांच्या समक्ष प्रतिबंधित अन्नपदार्थ असलेले वाहन क्र. एमएच १२ क्यूजी १०४३ ची तपासणी करून सर्व माल जप्त केला.

    या जप्त केलेल्या वाहनामध्ये प्रतिबंधीत करण्यात आलेला अन्न पदार्थ विक्रीसाठी साठा करून, वाहतूक करताना आढळला. यामध्ये १) ५ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा विमल पान मसाला ( हिरवा रंग) प्रत्येकी १९८  ग्रँमचे ३००० पँक पुडे एकुण वजन ४१२.५ किलो ग्रॅम २) १ लाख २० हजार रुपये किंमतीचा विमल पान मसाला ( जांभळा रंग) प्रत्येकी ८७ ग्रँमचे १००० पॅक पुडे एकुण वजन ८७ किलो ग्रॅम ३) १ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा विमल पान मसाला ( निळा रंग) प्रत्येकी १४३ ग्रँमचे १००० पँक पुडे एकुण वजन १४३ किलो ग्रॅम ४) ३३ हजार  रुपये किंमतीचा व्हीवन सुगंधी तंबाखु (हिरवा रंग) प्रत्येकी अंदाजे ११ ग्रँमचे १५०० पँक पुडे एकुण वजन १६.५ किलो ग्रॅम ५) ६० हजर रुपये किंमतीचा व्हीवन तंबाखु (जांभळा रंग) प्रत्येकी अंदाजे १५ ग्रँमचे २००० पँक पुडे एकुण वजन ३० किलोग्रँम असा एकुण किंमत ९ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला. तसेच पदार्थाच्या वाहतूकीसाठी वापरलेले ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आली.

    याप्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक बाबू धुळा काळे व गाडी मालक यांचे विरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments