Breaking News

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर युगाचा अस्त - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर


Death of  Lata Mangeshkar marks the end of Swar Yuga - tribute to Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 6 फेब्रुवारी  -    स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने एका स्वर युगाचा अस्त झाला आहे, लता दिदींनी गायलेल्या मधुर गाण्यांनी कोट्यावधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य केले आहे.  लता दिदींनी आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध केले होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टिसह संगीत क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे. संगीत क्षेत्रात भारताचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने एका स्वर युगाचा अस्त झाला असल्याची झाल्याची शोकसंवेदना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

No comments