Breaking News

कमीतकमी तोंडाला मास्क तरी लावा! - सभापती श्रीमंत रामराजे यांचे जनतेला कळकळीचे आवाहन

Wear a face mask! - Speaker Shrimant Ramraje's appeal to the people

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ जानेवारी - सध्या कोविड चे संक्रमण पुन्हा वाढू लागले आहे, तिसरी लाट येते की काय अशी शंका येत आहे, त्या अनुषंगाने सर्वत्र निर्बंध लावण्यात आले आहेत. शासकीय पातळीवर  रुग्णांना सुविधा  उपलब्ध करून देण्याच्या हालचाली चालू आहेत, औषधे, ऑक्सिजन यांची कमतरता पडणार नाही याची काळजी शासन घेईलच,  परंतु तुमच्या जे हातात आहे, त्याची तरी काळजी तुम्ही घ्यावी, ही माझी तुम्हाला, विनंती राहील, सर्वांनी निर्बंधांचे पालन करावे व  मास्क परिधान करावे.  तोंडाला कमीतकमी मास्क जरी लावले, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल त्यामुळे सर्वांनी मास्क परिधान करावे असे आवाहन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    फलटण शहरातील, नेमत पेट्रोलपंप व नाना पान शॉपीच्या उद्घाटन प्रसंगी,  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जनेतीशी संवाद साधताना, जनतेला  मास्क घालण्याबाबत आवाहन केले.

    फलटणसह सातारा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात  कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे.  शासनाने निर्बंध घातले आहेत. सर्वांनी मास्क घालून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मागील वर्षांमध्ये कोरानाची  दुसरी लाट येऊन गेली,  प्रामुख्याने दुसऱ्या लाटेचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आता संभाव्य कोरोनाची तिसरी लाट येऊ पाहत असताना, या लाटेचा मुकाबला करण्यासाठी फलटण तालुक्यासह जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, तशा स्वरुपाच्या सक्त सूचना आपण प्रशासनास दिल्या आहेत, त्यामुळे १ हजार रुग्ण एका वेळी आपण मॅनेज करु शकतो अशी व्यवस्था केली आहे. तरीपण प्रतिबंध म्हणून आपण सर्वांनीच मास्क घातले पाहिजे त्याचबरोबर शासनाने लावलेल्या निर्बंधाचे पालन केले पाहिजे असे आवाहन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

No comments