Breaking News

नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करावे

Applications for Nari Shakti Award should be submitted till 31st January

     सातारा   (जिमाका) : केंद्र शासनाने ज्या महिला व संस्थांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मौलिक कार्य केले आहे. अशा महिला व संस्थांच्या सन्मानार्थ केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. संस्थेसाठी  व वैयक्तिक पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्रक व रुपये दोन लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार वैयक्तिक व संस्थेसाठी अशा दोघांसाठी आहे.  

     वैयक्तिक पुरस्कारासाठी महिलेचे वय किमान 1 जुलै 2021 रोजी पंचवीस वर्ष पूर्ण असावे तर, अर्जदार संस्थेसाठी  किमान पाच वर्षे या क्षेत्रात संस्था कार्यरत असावी. ऑन लाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारास पुरस्कार प्राप्त नसावा.

    पात्र इच्छुक महिला व्यक्ती व संस्थांचे विहीत नमुन्यातील अर्ज फक्त ऑन लाईन www.awards.gov.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. अर्जदाराने अर्ज , नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत केवळ ऑनलाईन  सादर करावेत, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. ए. तावरे यांनी कळविले आहे.

No comments