फलटणच्या विरेंद्र गुंजवटे यांची राहुरी विद्यापीठ बॅडमिंटन संघ कर्णधारपदी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालय फलटणचा विद्यार्थी विरेंद्र हणमंतराव गुंजवटे यांची राजीव गांधी प्रुद्योगिकी, भोपाळ येथे होणाऱ्या प. विभागीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेतील म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
फलटणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे यांचा पुतण्या आणि राहुरी विद्यापीठ संघातील अष्टपैलू खेळाडू विरेंद्र हणमंतराव गुंजवटे यांची विद्यापीठ संघाच्या निवडीची माहिती समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विरेंद्र गुंजवटे यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षेकेतर कर्मचारी व सेवक वर्ग यांचा समावेश आहे.
No comments