Breaking News

गिरवी येथे तरस आढळले ; वनविभागाकडून तरसाची पुन्हा वनक्षेत्रात रवानगी

Taras were released back into the habitat by the forest department

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ जानेवारी - हराटी मळा, गिरवी, ता. फलटण येथील ऊसाच्या शेतात आढळलेला तरस हा वन्य प्राणी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडून फलटण येथे आणून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तंदुरुस्त असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात (वनक्षेत्रात) सोडण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल फलटण एम. यू. निकम यांनी कळविले आहे.

     याबाबत अधिक माहिती देताना वन क्षेत्रपाल निकम म्हणाले, हराटी मळा, गिरवी येथून निखील राजेश जाधव रा. गिरवी यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय, फलटण येथे भ्रमणध्वनी वरुन, तरस हा वन्यप्राणी हराटी मळा, गिरवी येथील सुरेश नानासो निकाळजे यांचे लोकवस्ती नजिक असलेल्या मालकी क्षेत्रातील ऊसात लपुन बसला असल्याची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी व वन्यजीव संरक्षक व संशोधन संस्था, सातारा (WLPRS) चे सदस्य असे सर्वजण हराटी मळा, गिरवी येथे जाऊन पाहणी केली असता, तरस हा वन्यप्राणी ऊसात बसलेला दिसून आला. 

     वनक्षेत्रपाल फलटण एम. यू. निकम यांनी सदर ठिकाणी उपस्थित लोकांना घडलेल्या घटनेबाबत माहिती विचारली असता सकाळच्या प्रहरामध्ये २ तरस एकमेकांशी भांडताना दिसले, काही वेळानंतर त्यापैकी एक तरस लोकवस्तीकडे येत असल्याचे दिसलेने जमावाने त्यास हुसकावणेस सुरुवात केली त्यामुळे दमलेला तरस ऊसाच्या शेतात जाऊन बसला असलेचे उपस्थितांनी सांगितले. 

    सदर घटनेचा वृत्तांत ऐकल्यानंतर  वनाधिकारी व WLPRS चे सदस्य यांनी एकविचाराने सदरचा तरस हा ऊसातुन हुसकावून त्याचे अधिवासात सोडणेची तयारी केली, परंतू नजीक असलेल्या लोकवस्तीमुळे व लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन तरस पकडून ताब्यात घेणेबाबत ग्रामस्थांनी एकमुखी मागणी केल्यानंतर सदर वन्यप्राणी तरस ताब्यात घेऊन  वनविभाग कार्यालय, फलटण येथे आणल्यानंतर उप वनसंरक्षक सातारा एम. एन. मोहिते यांचे आदेशानुसार तसेच सहाय्यक वनसंरक्षक, रोहयो व वन्यजीव, सातारा श्रीमती आर. ए. व्होरकाटे यांचे मार्गदर्शनानुसार सदर तरस या वन्यप्राण्यांचे पशू वैद्यकीय अधिकारी, फलटण यांच्याकडुन तंदुरुस्त असलेची खात्री करुनच त्याला काल सोमवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी त्याचे अधिवासात सोडण्यात आले असलेचे वनाधिकारी एम. यू. निकम यांनी सांगितले.

1 comment: