Breaking News

खटकेवस्ती येथील जुगार अड्ड्यावर छापा; ११ जणांवर गुन्हा दाखल

Raid on gambling den at Khatkevasti; Crimes filed against 11 persons

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ जानेवारी -  खटकेवस्ती ता. फलटण हद्दीत  चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर, फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून, जुगार खेळणाऱ्या ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत एकूण ३६ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान जुगार खेळणाऱ्या पैकी ६ ज पळून गेले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक गोडसे यांनी सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवनणे यांचे  एक पथक तयार करून त्यांना, मौजे खटकेवस्ती ता. फलटण गावचे हद्दीत इसम नामे अशोक ऊर्फ मुस्सा मोतीराम वाघमोडे त्याचे मालकीचे बंद खोलीत जुगार अड्डा चालत असल्याने, सदर अड्डयावर छापा मारण्याचा आदेश दिला. त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दोन पंचासह व पोलीस पथकासह सदर ठिकाणी जावुन छापा टाकला असता, तेथे इसम नामे १) नितीन नामदेव गावडे वय ३८ वर्षे, रा.खटकेवस्ती ता. फलटण २) ताया शंकर निंबाळकर वय ४० वर्षे रा.डोर्लेवाडी ता. बारामती जि. पुणे ३) शैलेश भिमराव सोनवणे वय ४८ वर्षे, रा. बारामती ता. बारामती ४) इरफान सादिक तांबोळे वय ३२ वर्षे रा. बारामती सटवाजी नगर ता. बारामती ५) दत्तात्रय रामचंद्र पिंगळे वय २८ वर्षे रा. घोलपवाडी ता. इंदापुर जि.पुणे ६) अशोक ऊर्फ मुस्सा मोतीराम वाघमोडे रा. खटकेवस्ती ता. फलटण ७) सिद्धार्थ संतोष घाडगे रा.इंदापुर चौक बारामती जि. पुणे, ८) सुनिल गजानन खटके रा. खटकेवस्ती ता. फलटण ९) राजेंद्र दिनकर घाडगे रा. खटकेवरती ता. फलटण १०) धिरज ज्ञानदेव नलवडे रा. गवळीनगर ता. फलटण व ११) निराआप्पा वाघमोडे (पुर्ण नाव माहित नाही.) रा. खटकेवस्ती ता. फलटण हे  जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा अधिकारी सातारा यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून, स्वतः मास्कचा वापर न करता, हयगयीने बेदारकपणे मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून, संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य करून, एकत्र येवुन पत्याचे पानावर, पैसे लावुन तिन पानी पत्ते नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलीसांना पाहून त्यांच्या पैकी आरोपी क्र. ६ ते ११ ताब्यातील पत्याची पाने जागीच सोडुन व डावातील पैसे घेवून पळुन गले.

    सदर ठिकाणी  एकूण ३६,९७०/-रुपयाचे किंमतीचे जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन व रोख रक्कमेसह मिळुन आल्याने त्यांच्या विरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत गु.र.नं. ७२/२०२२ भा.द.वी.स कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (च), महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० चे कलम ११ महाराष्ट्र जुगार अधिनियम ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर जुगाराचा आड्डा चालवणारे अशोक ऊर्फ मुस्सा मोतीराम वाघमोडे रा.खटकेवस्ती ता. फलटण, सुनिल गजानन खटके रा.खटकेवस्ती ता. फलटण व इतर ४ इसम हे सदर ठिकाणाहुन पळुन गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    सदरची कामगिरी ही श्री. तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण व श्री. धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस यांचे मार्गदर्शनाखाली बरड पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री. अक्षय सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक, म. पोलीस उपनिरीक्षक धोंगडे, पो. हवा. टिळेकर, म.पो. हवा. कदम, चालक बडे पो. हवा., पो.कॉ. अवघडे  यांनी केलेली आहे.

No comments