Breaking News

प्रकृती हेल्थ रिसॉर्टसच्या वतीने 21 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन

 प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट येथे परमपूज्य हरिभाऊ निटूरकर उर्फ भाऊ महाराज यांचे स्वागत करताना वैद्य सुयोग दांडेकर सौ .नेहा दांडेकर व इतर (फोटो - अतुल देशपांडे सातारा)
Prakriti Health Resorts Organizes Online Shrimad Bhagwat Week on the Occasion of 21st Anniversary

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा)  - येथील कास- पठार रोडवर यवतेश्वर गावानजीक असणाऱ्या सुप्रसिद्ध प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट आरोग्य सेवेला नुकतीच वीस वर्षे पूर्ण झाली. या रिसॉर्टच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने प्रकृती हेल्थ रिसॉर्ट येथेच 23 जानेवारी 2022पासून श्रीमद् भागवत सप्ताहाचे ऑनलाइन फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजन करण्यात आले आहे .या सप्ताहासाठी परमपूज्य श्री हरिभाऊ निटूरकर जोशी ऊर्फ भाऊ महाराज हे मार्गदर्शन करणार आहेत .

    दरम्यान परमपूज्य हरिभाऊ निटूरकर उर्फ भाऊ महाराज यांचे प्रकृती हेल्थ रिसॉर्ट येथे आगमन झाल्यावर पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले .यानिमित्त प्रकृती रिसॉर्टचा सर्व परिसर आकर्षक महा रांगोळ्या तसेच फुलापानांनी सुशोभित करण्यात आला होता. भाऊ महाराजांचे आगमन झाल्यावर पारंपारिक पद्धतीने सुवासिनींनी त्यांचे औक्षण केल्यावर या प्रकृती रिसॉर्टच्या विविध उपचार पद्धतीच्या प्रकारांची माहिती घेत महाराजांनी विविध दालनांना भेट दिली. यावेळी वैद्य सुयोग दांडेकर यांचे समवेत सौ. नेहा दांडेकर शर्वरी दांडेकर डॉ. अंकित पारंगे, तेजस पवार, बीव्हीजी ग्रुपचे महेश दबडे तसेच प्रकृती जिओ फ्रेश, साई माऊली संस्थाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

    या भागवत सप्ताहाचे निमित्ताने प्रकृती हेल्थ रिसॉर्ट मध्ये एक अनोखा  उपक्रम आयोजित करण्यात येत आहे याबद्दल बोलताना वैद्य सुयोग दांडेकर म्हणाले की, आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या अनुषंगाने प्रकृती परिवार गेली वीस वर्षात विविध प्रकारच्या आजारावर लाखोंच्या संख्येने रुग्णांना बरे करण्यात यशस्वी झाला आहे. ही उपचार पद्धती केली जाताना असंख्य नागरिकांचे आशीर्वाद ,शुभेच्छा आणि सहभाग यामध्ये निगडित आहे म्हणूनच कृतज्ञता सप्ताहाच्या दृष्टीने वर्धापन दिनानिमित्त हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओमिक्रोन च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मनात असूनही प्रकृती रिसॉर्ट वर प्रेम करणाऱ्या सर्वांना या सप्ताहासाठी बोलवता येत नाही तरीही हा कार्यक्रम ऑनलाइन फेसबुक लाईव्ह द्वारे घरबसल्या आपणा सर्वांना अनुभवता येणार आहे यासाठी वेळ 23 जानेवारी ते 28 जानेवारी असून दररोज दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल तसेच 29 जानेवारीला सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाणार आहे अशी माहिती वैद्य सुयोग दांडेकर यांनी यावेळी दिली.

No comments