Breaking News

सातारा जिल्ह्यात कोरोना वाढला ! 733 पॉझिटीव्ह, 1 बाधितांचा मृत्यु

Corona grows in Satara district! 733 positive, death of 1 victim

     सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 12 जानेवारी -  सातारा जिल्ह्यात काल दि. 11  जानेवारी  रोजी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 733 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले आहेत, तर  2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.   

      तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.

     जावली 35 (10183), कराड  106 (39729), खंडाळा 46 (14362), खटाव 41 (26071), कोरेगांव 41 (22087), माण 22 (18149), महाबळेश्वर 43 (4956), पाटण 35 (10271), फलटण 51 (37757), सातारा 223 (52940), वाई 68 (15982) व इतर 15 (2360) असे आज अखेर एकूण 254847 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर  फलटण  येथे उपचारादरम्यान 1 कोरोना रुग्णांचा मृत्यू  झाला आहे.

     जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 116 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

No comments