फलटण तालुक्यात 80 कोरोना पॉझिटीव्ह ; शहर 18, ग्रामीण 62
फलटण दि. 13 जानेवारी 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 12 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 80 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 18 रुग्ण तर ग्रामीण भागात 62 रुग्ण सापडले आहेत.
दि. 12 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 80 बाधित आहेत. 80 बाधित चाचण्यांमध्ये 47 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 33 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 18 तर ग्रामीण भागात 62 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खराडेवाडी 2, खामगाव 1, साखरवाडी 7, जाधववाडी 3 , खडकी 2 , ठाकुरकी 2, कापशी 1, कोरेगाव 2, मिरेवाडी 3, हिंगणगाव 2, जिंती 3, निंभोरे 2, गिरवी 3, शेरेचीवाडी 2, सासवड 3, सुरवडी 4, उपळवे 3, वाखरी 1, वाठार निंबाळकर 1, चव्हाणवाडी 1, तावडी 2, आदर्की 1, धुळदेव 1, खटकेवस्ती 1, ढवळेवाडी (निं) 1, काशीदवाडी 1, काळज 1, कापडगाव 1, कोळकी 1, विडणी 1, फडतरवाडी 2, सालपे 1, रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments