Breaking News

फलटण तालुक्यात 161 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 40, कोळकी 14, साखरवाडी 8

161 corona positive in Phaltan taluka; 40 in the city, 14 in Kolaki 

     फलटण दि. 19 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 18 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 161 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 40  रुग्ण तर ग्रामीण भागात 121  रुग्ण सापडले आहेत.    तर तालुक्यात कोळकी येथे 14    व साखरवाडी  येथे 8  बाधित रुग्ण सापडले आहेत.  दरम्यान फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, तिसऱ्या लाटेत प्रथमच 161 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असुन ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.

     दि. 18 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 161 बाधित आहेत. 161 बाधित चाचण्यांमध्ये 71 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 90 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 40 तर ग्रामीण भागात 121 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 14, साखरवाडी 8, जाधववाडी 7,  धुमाळवाडी 2, खुंटे 1,  बरड 2, काळज 2,   मुरूम 3, मिरढे 1,  मिरेवाडी 2,  मिरगाव 1, हिंगणगाव 1,  विडणी 3,  जिंती 2, निंबळक 2, निंभोरे 1, गिरवी 5, होळ 6, भाडळी 1, भाडळी खुर्द 1,  पाडेगाव 5,  फडतरवाडी 3, सरडे 1,  साठे 4, सासवड 1, सालपे 1, सस्तेवाडी 2, सुरवडी 1, वाठार निंबाळकर 2, तरडगाव 5, जाधवनगर 1, आळजापुर 1, आदर्की बुद्रुक 4, गुणवरे 2, धुळदेव 3, बोडकेवाडी 1, बिबी 1, झिरपवाडी 2, हणमंत वाडी 1, वडगाव 1, चौधरवाडी 2, आरडगाव 1, आसू 1, आदर्की 4, खरेवडगाव 1 , लोणंद तालुका खंडाळा 3,  तोंडले तालुका माण 1,  नेवासा तालुका नेवासा 1, रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments