राज्यात दिवसभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 31 नवे रुग्ण
राज्यात आज ओमायक्रॉनच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या 31 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 141 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 61 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. राज्यातील 31 पैकी 27 रुग्ण हे मुंबईतील आहे.
राज्यात ओमायक्रॉनबरोबरच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढच होताना दिसत आहे. आज दिवसभरात 1648 नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. तर उपचारानंतर 918 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के एवढे झाले आहे.
No comments