श्री सद्गुरू हरीबुवा महाराज पतसंस्थेची आज 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्री सद्गुरू हरीबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण या संस्थेची सन २०२०- २१ चे लेखापरीक्षण एस. यु. कटारिया यांनी पूर्ण केले असून, सदर संस्थेस दिनांक ३० मार्च २०२१ अखेर १ कोटी २२ लाख एवढा नफा झाला असून, संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी दिली. संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २३/१०/२०२१ रोजी सायंकाळी ४:३० वाजता, महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मी नगर रिंग रोड, फलटण येथे आयोजित केली आहे तरी सदर सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी केले आहे.
No comments