Breaking News

कोळकी येथे मंदिराच्या दानपेटीतील रक्कमेची चोरी ; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Theft of money from the temple donation box at Kolaki

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ ऑक्टोबर - कोळकी ता. फलटण गावचे हद्दीत श्री दत्तकृपा ट्रेडर्स दुकानाचे आवारत असलेल्या श्रीदत्त मंदीर येथे दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरासमोरील दान पेटीचे कुलुप तोडुन आतील रोख रक्कम चोरुन नेली आहे. दरम्यान चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून त्यानुषंगाने पोलिसांचा तपास चालू आहे.

    कोळकी ता. फलटण येथे जित हॉटेल समोर दहीवडी फलटण रोडलगत  मयुर रमेश साळुंखे यांचे श्री दत्तकृपा ट्रेडर्स नावाचे बिल्डींग मटेरीयलचे दुकान आहे. या दुकानाचे आवारात श्री दत्त मंदीर आहे. दिनांक ९/१०/२०२१ रोजी  मयुर रमेश साळुंखे हे कुटुंबासह देवदर्शानासाठी  गेले होते. ते दिनांक १२/१०/२०२१ रोजी देवदर्शन करून कोळकी येथे घरी आले. त्यावेळी  दुकानातील कामगाराने, मयूर साळुंखे यांना सांगितले की, दत्त मंदीरामधील दानपेठीचे कुलुप तुटलेले आहे. त्यानंतर साळुंखे यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, त्यात दिनांक ९/१०/२०२१ रोजी दुपारी २:३० ते ३:३० वाजण्याच्या सुमारास लाल रंगाची बजाज पल्सर  मोटार सायकलवरुन दोघांनी दत्त मंदीरातील दान पेटीचे कुलुप तोडुन, त्यातील पैसे चोरुन नेल्याचे दिसले. त्यामध्ये ७ हजार रुपये होते व ते चोरट्यांनी चोरून नेले असल्याची फिर्याद मयुर रमेश साळुंखे यांनी दिली आहे.

No comments