Breaking News

केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर - खासदार शरद पवार

Misuse of investigative machinery by Central Government - MP Sharad Pawar

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर  जोरदार निशाना साधला आहे. तेलाचे आंतरराष्ट्रीय दर कमी झाले आहेत. तरी केंद्र सरकारने इंधनाच्या किमती कमी केलेल्या नाहीत, त्याच बरोबर  केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर वापर करत असल्याची  टीका पवार यांनी केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पिंपरी-चिंचवडमध्ये काल  आले होते, यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.

    केंद्र सरकारला सामान्य लोकांविषयी आस्था नाही. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य माणसाला महागाईच्या दरीत ढकलते आहे. आजची देशाची आणि राज्याची परिस्थिती आगळी-वेगळी आहे. सामान्यांचे प्रश्न वाढत आहेत. पण केंद्राला याची आस्था नाही. प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतच आहेत हे असे कधी घडले नव्हते. केंद्र म्हणते आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने हे होते. पण काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या तरी केंद्राने आपल्या देशात किमती कमी केल्या नाहीत.

    राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा आरोप केल्यानंतर लगेच तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे? राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे, असेही पवारंनी सांगितले.

No comments