श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते 'गंधवार्ता' च्या श्रीमंत संजीवराजे वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ ऑक्टोबर - महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ‘लक्ष्मी – विलास' या त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त 'गंधवार्ता' ने प्रसिद्ध केलेल्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सुभाष भांबुरे, दैनिक गंधवार्ताचे संपादक अॅड. रोहित अहिवळे, गुरुयात्राचे शंतनु रुद्रभटे, निंभोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकुंद रणवरे, बापूराव गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments