Breaking News

झडकबाईचीवाडी येथील पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांचा छापा ; 3 लाख 85 हजरांचा मुद्देमाल जप्त

Police raid gambling club at Jhadakbaichiwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० ऑक्टोबर -  झडकबाईचीवाडी ता.फलटण येथील सागर ढाबा येथे सुरू असणाऱ्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार क्लबवर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला, यामध्ये पैशावर जुगार खेळणाऱ्या, सागर ढाबा मालकासह नऊ जणांना ताब्यात घेतले असून, छाप्यात ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

     फलटण ग्रामीण पोलिसांना त्यांच्या बतमीदारकडून, सागर ढाबा येथे तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची खबर मिळाल्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून दि.९/१०/२०२१  राेजी ६ वाजण्याच्या सुमारास झडकबाईचीवाडी ता.फलटण हद्दीतील फलटण - पुसेगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या, सागर ढाब्याच्या  ईमारतीमध्ये सुरू असणाऱ्या 3 पानी पत्यांच्या जुगार क्लब वर छापा टाकला. यावेळी १) सतीश हनुमंत शिंदे  २) प्पा लालासाे सालगुडे ३)शहाबुद्दीन यासिन आतार ४) सचिन संपत सोनवलकर   ५) धनाजी शिवाजी जाधव  ६) राकेश मच्छिंद्र नवले  ७) केशव तात्याबा वाघ ८) तुळशीराम परशुराम घाडगे   ९) तानाजी नारायण वाघ हे स्वतः च्या आर्थिक फायद्याकरिता, तीन पानी पत्त्यांचा जुगार, पैजेवर पैसे लावून खेळत असताना, मिळून आले आहेत. जुगार खेळण्यासाठी तानाजी नारायण वाघ रा. ताथवडा ता. फलटण जि. सातारा यांनी, त्यांच्या आर्थिक फायद्याकरिता त्यांच्या स्वतःचे मालकीचे सागर ढाबा या हॉटेलची इमारत उपलब्ध करून दिली होती. त्या अनुषंगाने सागर बाबा चे मालक तानाजी नारायण वाघ यांच्यासह 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    छाप्यामध्ये जुगाराचे साहीत्य, राेख रक्कम , माेटार सायकली व माेबाईल असा एकूण ३,८३,०९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एस.जी.शिंदे हे करीत आहेत.

No comments