फलटण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मान्यवरांचा बोधिवृक्ष देऊन सन्मान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आवाहनानुसार, फलटण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, पत्रकार नासिर शिकलगार, बापूसाहेब जगताप, युवराज पवार, शक्ती भोसले, उद्योजक शंकरशेठ पवार, काकासाहेब पवार या मान्यवरांचा बोधिवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते हरीश काकडे उर्फ आप्पा, उद्योजक संग्राम अहिवळे, अक्षय अहिवळे, आदित्य उर्फ बंटी साबळे, शिवेंद्र कांबळे यांनी केले होते. बाळासाहेब काकडे (तात्या) उपस्थितांचे आभार मानले.
No comments