कृषि विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - सुभाष भांबुरे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) :-महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीचे चेअरमन सुभाष भांबुरे यांनी केले .
महाराष्ट्र शासन कृषी विभाग फलटण व फरांदवाडी कृषीक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि.यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत तृणधान्य विकास कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी 25 एकराचे ज्वारी बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी कृषिक्रांती कंपनीच्या माध्यमातून शेतकरी सुविधा केंद्रात संपर्क करून शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना कृषी सहाय्यक फरांदवाडी सौ .ए .एस .बोराटे यांनी ज्वारी पेरणे पूर्वी करावयाची बीज प्रक्रियेबाबत माहिती दिली .तसेच सलग फळबाग लागवड व बांधावरील फळबाग लागवड करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचे अवाहन केले .
सदर कार्यक्रमासाठी कंपनीचे संस्थापक- दत्तात्रय राऊत,मार्गदर्शक- राजेंद्र राऊत ,विकास फरांदे, विठ्ठल हिंगणे,संचालक- कपिल राऊत, व्यवस्थापक -विजय राऊत, सभासद शेतकरी- दत्तात्रय नाळे, दिलीप दळवे ,संदीप घनवट, पोपट बोराटे , राजेंद्र फरांदे हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय राऊत यांनी केले. आभार कपिल राऊत यांनी मानले.
No comments