Breaking News

कार्यकुशल लोकनेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Efficient public leader Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

    फलटण संस्थानला भारत देशामध्ये पुरोगामी लोकशाहिपूरक व दानशूर संस्थान म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याने मोलाची कामगिरी बजावलेली आहे. श्रीमंत मुधोजीराजे व श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी शैक्षणिक व सामाजिक सुधारणेला अग्रस्थान देऊन समतावादी समाज निर्मितीला आपल्या संस्थानात प्रोत्साहन दिले. असा माणलसकीचा 'वारसा' लाभलेल्या नाईक निंबाळकर घराण्यात श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर यांचा जन्म झाला. आज त्यांचा वाढदिवस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेताना आनंद होत आहे.

    भारतामध्ये सातारा जिल्ह्याला स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून देणारे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्यात संपुर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रात अबालवृध्दांमध्ये 'बाबा' या शब्दाला अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झाले असल्यामुळेच श्रीमंत संजीवराजे हे तरूणांना आशास्थान वाटतात, वृध्दांना आधार वाटतात, राजकारण्यांना मार्गदर्शक वाटतात, तर सर्वसामान्यांना बाबा हेच आपले श्रध्दास्थान वाटतात आशास्थान वाटतात, ज्यांना बाबांनी नोकरीला लावले, ज्यांना बाबांनी अन्नाला लावले, त्यांना बाबा हेच आपले देव वाटतात, प्राचार्य प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या कर्मचाऱ्यांना बाबांनी उदरनिर्वाहचे साधन निर्माण करून दिले त्यांना सुध्दा बाबा इज मोअर दॅन गॉड वाटतात.

    महासागर हा महासागरच असतो. तो सगळ्यांनाच म्हणजे छोट्या-मोठ्या प्रवाहांना सामावून घेत असतो. वरुन शांत परंतु आतून विकासपर्वाच्या दिशेने झेपवणारा महासागर, प्रश्नांचा शोध घेऊन मानवी जीवनाच्या उज्वलतेकडे आपल्या अंतर्गत शक्ती सामर्थ्याचा मोहरा वळवून हिऱ्या माणकांच्या राशी देणारा महासागर, वैयक्तिक सुखदुखांना बगल देऊन सर्वसामान्य माणसांच्या भल्यासाठी अहोरात्र झटणारा व दुथडी काठोकाठ भरुन वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखा सतत विकासाची गंगा झोपड्या, पालापर्यंत पोहचवणारा महासागर म्हणजेच आमचे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होत. आजच्या पिढीचे ते एक सामाजिक व राजकीय मार्गदर्शक आहेत. ते खऱ्या अर्थाने धडाकेबाज लोकनेते आहेत. समाजाच्या सर्वकष विकासाची तळमळ असणारा लोकनेता म्हणून आज उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे पहात आहे.

    फलटण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न ऊसदराचा प्रश्न बचत गटांना निधी, फलटण शहराचा व तालुक्यातील गावांचा आरोग्यपूर्ण विकास अद्यायवत रस्त्यांची व्यवस्था फलटण नगरपरिषदेतील विकासकामांचे पर्व, मुलामुलींच्या शिक्षणाची समस्या, दळणवळणाची समस्या असो की, तालुक्यातील दुध व शेतीमालाच्या विक्रीचा प्रश्न असो, हे सारेच प्रश्न श्रीमंत संजीवराजे आव्हान स्वीकारून अत्यंत शांत व संयमाने सोडवत आलेले आहेत. एक दर्यादिल व विवेकी लोकनेते म्हणून त्यांचा आवर्जुन उल्लेख करणे गरजेचे आहे. या जगामध्ये बहुसंख्या माणसे जन्माला येतात, जगतात व व काळाच्या पडद्याआड निघुन जातात. ज्यांची नोंद फक्त ग्रामपंचायतीच्या व नगरपरिषदेच्या दमरातच असते. परंतु काही व्यक्ती जन्म घेतात वाढतात. घडतात व आपल्या सत्कर्माने आपले नाव इतिहासात अक्षय नोंदवतात. अशा पठडीतले व पोलादी मनगटाचे व मोठ्या मनांचे विशालकाय अंत:करणाचे व माणूसकीचे आमचे फलटण तालुका व सातारा जिल्ह्याचे लोकनेते व सातारा जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष म्हणजे श्रीमंत संजीवराजे होत, आज श्रीमंत संजीवराजेंचा वाढदिवस म्हणजे एक कार्यकुशल, कर्तुत्ववान, सुसंस्कारीत, राजस व सात्विक अशाच प्रकाशपुत्रचा वाढदिवस होय. त्यांनी श्रीमंत शिवाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत लहान वयात फलटण तालुक्याच्या राजकारणात उडी घेतली व आपल्या कार्यकुशलतेने ते लोकप्रिय नेते झाले. संजीवबाबा या नावाने त्यांची लोकप्रियता ओळखली जाते. राजपद हे राजऐश्वर्य व विलासात काढण्यासाठी नसून ते सर्वस्तरातील लोकांच्या म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी आहे ही फलटण राजघराण्याची विचारधारा संजीवराजेंच्या नसानसात भिनलेली दिसून येते. संजीवबाबांच्या वरती बहुसंख्य जनता प्रेम करते कारण बाबांचे या सर्वसामान्य माणसावर नितांत प्रेम आहे. लोकभावनेची व लोकविकासाची धडधडती नाडी पकडण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. तेवढेच लोकांचे प्रश्न व समस्या काय आहेत याची सक्षम जाणीव त्यांना असल्यामुळेच ते सहज लोकांच्या मदतीला धावतात.

    आता श्रीमंत संजीवराजेंची ५६ वर्षे उलटून गेली आहे. तरीही ते तरुणासारखे विकासाच्या दिशेने धावत आहेत. उद्योगशील मनोवृत्ती त्यांची दिससेंदिवस वाढतच आहे. त्यांनी शैक्षणिक संस्थानची झपाट्याने प्रगती करण्यासाठी पाउले उचलली आहेत. त्यामुळे अनेक शैक्षणिक शाखा गुणवत्तेच्या शिखरावर पोहचलेल्या आहेत. लोकांना त्यांनी उद्योगशील बनवले. त्यांना ते स्वयंविकासाचे मूल्य देऊन आर्थिक मदतही करत असतात.

    फलटण पंचायत समितीचे माजी सभापती, श्रीराम सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन, श्रीमंत मालोजीराजे सह. बँकेचे संचालक, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे सर्वेसर्वा, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अशा कित्येक चढत्या क्रमाने त्यांना पदे मिळाली व श्रीमंत संजीवबाबांचे व्यक्तिमत्व अधिकच प्रगल्भ व परिपक्क होत गेले. आपल्या प्रशासकीय कार्याच्या लोककल्याणकारी कौशल्याची त्यांची चुणूक अनेकवेळा प्रत्ययाला येताना दिसते. शांत, संयमी व विवेकी स्वभावाने ते अधिकच राजस व सात्विक वाटताना दिसतात. रागही सात्विक आणि राजस असतो ते जनताजनार्दनाच्या सुखापेक्षा दुखःमध्येच अधिक सहभागी होवून त्यांना दिलासा, सहकार्य व धीर देताना दिसतात. संजीवबाबांनी तालुक्यातील व जिल्हा स्तरावरील अनेक छोटे मोठे वाद, तड, तंटे सरळमार्गाने मिटविलेले आहेत व लोकांना विकासाच्या मार्गावर आणलेले आहे. सर्वांगिण असा विकास करताना त्यांनी कोणालाही तोशिस लागू दिली नाही. जिल्ह्यातील शेतीप्रिय विद्यार्थ्यांना शिकता यावे, संशोधन करता यावे, त्यांना आधुनिक शेतीची व शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायाची आवड निर्माण व्हावी म्हणून शेतीशाळेत सुलभ व परवडणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची उभारणी केली आहे. लांबच्या विद्यार्थ्यांना त्रास होवू नये म्हणून वसतिगृहाची सोय केली आहे. मुधोजी महाविद्यालयाच्या संकुलात नर्सिंग कॉलेजची निर्मिती केलेली आहे. तसेच श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर उद्यान महाविद्यालयात नामांकित व गुणात्मक दृष्ट्या अग्रेसर म्हणून ओळखले जातात. अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करुन युवकांना करिअरची संधी उपलब्ध करुन दिली आहे. उद्योगशीलता हे श्रीमंत संजीवराजेंचे अंगभूत वैशिष्ट्ये आहे. या तालुक्याच्या विकासाला पोषक असणाऱ्या अनेक योजना त्यांनी साकार केल्या आहेत. उद्योग कसा उभारावा, तो कसा वाढवावा व त्याचा सर्वांगिण विकास कसा करावा. याचा आदर्श बाबांच्याकडून आपण घेतला पाहिजे.
एक लोकविकासक व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण सातारा जिल्हा त्यांच्याकडे पाहतो आहे. गरीब, उपेक्षित सर्वसामान्य मानसाला पोटाशी धरणारा दयाळू राजपुत्र, तालुक्याची सुयोग्य सामाजिक व राजकीय घडी बसवणारा कसदार राजकीय सेनापती इ. सर्वच गुणवैशिष्ट्यांनी ते धडाकेबाज लोकनेते वाटताना आढळतात. श्रीराम सोसायटीच्या निवडणूक निमित्ताने सुरु के लेली राजकीय चळवळ त्यांनी लोकविकासात्मक राजकीय चळवळ बनवलेली दिसून येते. त्यांच्या सामाजिक व राजकीय चळवळीला लोकशाहीच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय इ.मूलभूत हक्क आणि अधिकारांचे पाठबळ असलेले दिसून येते. सहकार व बहुजन समाजाचा उद्धार हे ब्रीद त्यांच्या कार्यात आढळते.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेब, ज्येष्ठ नेते मा. अजित पवार, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे श्रीमंत संजीवराजे यांचा सर्वतोपरी प्रवास विकासात्मक मार्गाने सुरु आहे. श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांची भक्कम साथ त्यांच्या कार्यकर्तुत्वाला पाठबळ देत आहे. अशा जनतेच्या असणाऱ्या धडाकेबाज लोकनेत्याला राज्याचे व देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळो! श्रीमंत संजीवराजेंच्या वाढदिवसाला कोटी-कोटी शुभेच्छा!

 - प्रा.डॉ.प्रभाकर पवार

No comments