सुरवडी येथील एकावर खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० ऑक्टोबर - सात सर्कल, साखरवाडी येथील एकाने पत्नीच्या औषधोपचारासाठी, खाजगी सावकाराकडून 80 हजार रुपये कर्ज काढले, त्याच्या व्याजापोटी 3 लाख 20 हजार रुपये सावकाराला दिले, तरीही सावकार आणखी पैशाची मागणी करत होता, आणि बोलोरो चारचाकी वाहन नावावर करून दे, अशी मागणी करून शिवीगाळ, दमदाटी करत असल्याप्रकरणी सुरवडी येथील उमेश नरसिंग पवार याच्यावर आयपीसी व सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज भिमराव वाघमारे वय 36 वर्षे व्यवसाय नोकरी रा. सात सर्कल साखरवाडी ता.फलटण यांनी पत्नीच्या औषधोपचारासाठी उमेश नरसिंग पवार रा सुरवडी ता.फलटण जि. सातारा याच्याकडून ऑक्टोबर २०२० मध्ये एकूण ८० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यांनतर पंकज पवार यांनी मौजे साखरवाडी ता. फलटण गावचे हद्दीत तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे फलटण आगाराच्या ऑफिसमध्ये व इतर ठिकाणी ऑक्टोबर २०२० ते दि. १९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पंकज वाघमारे यांनी पवार यांना रोख रक्कम २ लाख २० हजार रुपये व गुगल पे वरून सुमारे ९७ हजार ७०० रुपये असे ३ लाख २० हजार रुपये दिलेले असताना, उमेश पवार यांनी पंकज भिमराव वाघमारे यांच्या बोलेरो गाडीची आरसी पुस्तक व स्टेट बँक ऑफ इंडिया फलटण शाखेचे खाते नंबर असलेले ४ चेक सह्या करून जबरदस्तीने घेतले आहेत ते परत देत नाही व बोलेरो कार नावावर करून दे असे म्हणून पंकज भिमराव वाघमारे यांना तसेच त्यांची पत्नी यांना राहते घरात जबरदस्तीने घुसून वारंवार अपशब्द बोलून शिवीगाळ दमदाटी करून मुले पाठवून तुम्हाला ठार मारीन अशी धमकी समक्ष व फोनवर देत असल्याची फिर्याद पंकज भिमराव वाघमारे यांनी दिली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास ए. एस. आय. यादव हे करीत आहेत.
No comments