Breaking News

राजुरी येथील बैलगाडी शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून उध्वस्त

Bullock cart race track at Rajuri destroyed by police

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ ऑक्टोबर - फलटण व माळशिरस तालुक्याच्या  सीमेलगत राजुरी गावच्या हद्दीत असणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे ट्रॅक जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करून, जागोजागी  मोठे खड्डे तयार करून बैलगाडी शर्यतीस फलटण ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंध केला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण व माळशिरस तालुक्याच्या सीमेलगत असणाऱ्या राजुरी गावांमध्ये बैलगाड्या शर्यती व जुगार यांचे आयोजन दर रविवारी होत असल्याची खबर फलटण ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी रविवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी या ठिकाणी छापे टाकले. परंतु याठिकाणी बैलगाड्या, बैल किंवा माणसे आढळून आली नाहीत. मात्र बैलगाड्या शर्यत ट्रॅक आढळून आले. या ठिकाणी असणारे बैलगाडी शर्यतीचे ट्रॅक जेसीबीच्या साहाय्याने फलटण ग्रामीण पोलीसांनी उध्वस्त केले असून, जागोजागी मोठे खड्डे पाडून, त्यात जुनाट बाभळी आणि इतर काटेरी झाडे टाकली आहेत, जेणे करून बैलगाड्या शर्यतीला प्रतिबंध होणार असल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी संगितले.

No comments