फलटण मध्ये २ किलो ५९२ ग्रॅम गांजा जप्त ; दांपत्यास अटक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ ऑक्टोबर - फलटण शहर पोलीसांनी, पाचबत्ती चौक, फलटण येथील घरावर छापा टाकून, २ किलो ५९२ ग्रॅम वजनाचा, १० हजार ८०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. गांजा तस्करी प्रकरणी दाम्पत्यास अटक करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २०/१०/२०२१ रोजी ६: ३७ वाजण्याच्या सुमारास, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, फलटण शहरामध्ये पाचबत्ती चौक, फलटण या ठिकाणी इसम नामे दस्तगीर महम्मद शेख त्यांची पत्नी आयशा दस्तगीर शेख असे गांजा विक्री करत आहेत. त्यानुसार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस नाईक तांबे, महिला पोलीस गाडेकर, महिला पोलीस कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल बगले, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे, पोलीस हवालदार धापते, यांना याबाबत माहीती देवून, छापा टाकण्यासाठी आवश्यक सर्व साधन सामुग्री तसेच आवश्यक इतर स्टाफ यांना सूचना देऊन छापा टाकण्यासाठी सांगितले.
त्यानुसार छापा पथक तसेच नायब तहसिलदार श्रीमती संजीवनी सावंत, सरकारी पंच, वजनमाप करणारे, फोटोग्राफर यांच्यासह मिळाले बातमीचे ठिकाणी पाचबत्ती चौक पोलिसांनी पाचबत्ती चौक फलटण येथे इसम दस्तगीर महम्मद शेख यांच्या राहत्या घरी जावुन छापा टाकला असता, आरोपी नामे दस्तगीर महम्मद शेख व त्यांची पत्नी आयशा दस्तगीर शेख यांच्या कब्जात २ किलो ५९२ ग्रॅम वजनाचा, २० हजार ८०० रुपयाचा गांजा मिळुन आला. त्याप्रमाणे पंचनामा करून, तो पंचासमक्ष जागीच सिलबंद करण्यात आला असून, सदर बाबत नवनाथ रघुनाथ गायकवाड सहा. पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांनी, त्यांचे विरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० (ब).२२ (ब) प्रमाणे सरकारतर्फे दिले फिर्यादी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत.
सदर कारवाई अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक, अजित बोराडे अप्पर पोलीस अधिक्षक, तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, निलेश देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी, बी के किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नवनाथ गायकवाड, पो.ना.शरद तांबे म. पो. शि. अनिता गाडेकर, म.पो.शि. रुपाली कुंभार, पो. को बगले, पोको गणेश ठोंबरे, पोहवा चंद्रकांत धापते चा.पो.ना. कर्पे, पो.हवा. माने, चा.पो. ना. मदने यांनी केली आहे.
No comments