दिगंबर आगवणे यांच्याकडून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण ; नवीन आंदोलनाला सुरवात
![]() |
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करताना दिगंबर आगवणे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ सप्टेंबर - फलटण शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या पार्श्वभूमीवर आयुर उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे यांनी, रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून जाहीर निषेध केला.
फलटण शहरात चाललेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे सर्व रस्ते खोदण्यात आलेले आहेत आणि खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्यामुळे शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य झालेले आहे, शहरातील काही भागांमध्ये तर भुयारी गटार योजनेचे काम दीड ते दोन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे परंतु अद्यापही तेथील रस्ते दुरुस्ती झालेले नाहीत, या सर्वांचा जाहीर निषेध करत, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून दिगंबर आगवणे यांनी एका नवीन आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी सागर गायकवाड, स्मित पवार, संभाजी शिंदे, सोमनाथ रासकर, प्रताप शिंदे, रणजीत धुमाळ, दादा कोळेकर, नामदेव जाधव, किरण लांडगे उपस्थित होते.
No comments