फलटण येथे हॅण्डग्रेनेड, लॉन्गरेंज गॅस यासह दंगा काबू योजनेची तालीम ; शहरातून रुटमार्च
![]() |
शहरातील प्रमुख मार्गावरून रुटमार्च करताना |
Training on riot control plan including hand grenade, longrange gas at Phaltan; Route march through the city
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ सप्टेंबर - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे कामी काल दिनांक 8/9/2021 रोजी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून रुटमार्च करण्यात आले त्यानंतर पोलीस परेड ग्राउंडवर जातीय दंगा काबू योजनेचा सराव हॅण्डग्रेनेड, लॉन्गरेंज गॅस यांच्यासह शस्त्राद्वारे करण्यात आला.
![]() |
शहरातील प्रमुख मार्गावरून रुटमार्च करताना |
काल दिनांक 8/9/2021 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या उपस्थितीमध्ये फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत महात्मा फुले चौक- गजानन चौक -श्रीराम मंदिर - शिवशक्ती चौक- बारामती चौक - छ.शिवाजी महाराज चौक - डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक - अशोकराव भोईटे चौक - महात्मा फुले चौक असा रूट मार्च काढण्यात आला.
![]() |
पोलीस परेड ग्राउंडवर जातीय दंगा काबू योजनेचा सराव करताना |
जातीय दंगा काबू योजनेकरिता प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे तसेच फलटण पोलिस उपविभागातील फलटण शहर पोलीस ठाणे कडील 4 अधिकारी 20 पोलीस अंमलदार, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडील 2 अधिकारी 10 पोलीस अंमलदार, लोणंद पोलीस ठाणे कडील 1 अधिकारी 11 पोलीस अंमलदार, खंडाळा पोलीस ठाणे कडील 3 अधिकारी 10 पोलीस अंमलदार, शिरवळ पोलीस ठाणे कडील 1 अधिकारी 11 पोलीस अंमलदार असे लाटी, हेल्मेट, ढाल, गॅस गन, हॅण्डग्रेनेड, दारुगोळ्यासह हजर होते.
जातीय दंगा काबू योजनेकरिता 8 सरकारी चार चाकी वाहने,2 मोटरसायकली, अग्निशामक ,ॲम्बुलन्स हजर होते.दंगा काबू योजना सराव/रूट मार्च/मोक ड्रिल व्यवस्थितरीत्या घेण्यात आली असल्याचे फलटण शहर पोलीस स्टेशन कडून कळविण्यात आले आहे.
No comments