कोळकी येथे ६१ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी ; खिडकीचे गज कापून केला घरात प्रवेश
फलटण दि.१२ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - शरदानगर, कोळकी ता. फलटण येथील सेवानिवृत्त शिक्षिकेच्या बंद घराच्या खिडकीचे गज तोडून आज्ञात चोरट्यांनी १४ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे ६१ तोळे सोन्याचे दागीने लंपास केले आहेत. दागीण्यांची किंमत तत्कालीन पावतीनुसार १४ लाख रुपये होत असली तरी आजच्या सोन्याच्या भावानुसार ती किंमत ३० लाख रुपयांच्या घरात जात आहे.
कोळकी गावातील शारदानगर येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती कस्तुरा सिताराम माळी वय ६३ या आपल्या भाच्याकडे मार्डी ता. माण येथे गेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे घर बंद होते. शुक्रवार ता. १० सप्टेंबरच्या सायंकाळी ७ ते ११ सप्टेंबर रोजीच्या सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या, बंद घराच्या खिडकीचे गज तोडून, ते वाकवून घरात प्रवेश करुन, त्यांचे व त्यांची बहिण सौ. शकुंतला सिताराम माळी यांचे, सोन्याचे दागीने चोरुन नेले. या घरफोडीत चोरट्यांनी कस्तुरा माळी यांचे चार हजार ३८० रुपये किंमतीचे टॉप्स, सहा हजार ३०० रुपये किंमतीचे टॉप्स, सतरा हजार ३०० रुपये किंमतीचे बदाम व अंगठी, नउ हजार २०० रुपये किंमतीची अंगठी, दहा हजार ४०० रुपये किंमतीची कानातील चैन, दोन हजार ७७४ रुपये किंमतीचे कानातील झुबे व अंगठी, पाच हजार १२ रुपये किंमतीची कानातील खड्याचे टॉप, एक हजार ६६७ रुपये किंमतीचे झुबे व फुले, नऊ हजार १०० रुपये किंमतीचे टॉप, पाच हजार ४०० किमतीचे झुबे, सातहजार २७६ किमती कानातले टॉप्स, पाच हजार ९०० किमतीचे कानातले, आठ्ठावीस हजार ६२० किमतीचे झुबे, २४ हजार ५७८ किंमतीचे झुबे, ७ हजार ९०० किमतीचे कानातले टॉप, ४ हजार ४०० किमतीचे टॉप्स, एक लाख ७१ हजार ६०० रुपये किमतीच्या दोन पाटल्या, एक लाख ७६ हजार ६०८ रुपये किंमतीच्या चार बांगड्या, एक लाख ७५ हजार ३१४ किंमतीचे चार गोठ, १९ हजार १७० किंमतीची अंगठी, १५ हजार ७२० किंमतीची अंगठी, १४ हजार २०० रुपयांचे झुबे, ६ हजार ४० रुपयांची कानातील फुले, ९४ हजार ५०० रुपये किंमतीचे गंठण, ९१ हजाराचे गंठण, एक लाख ६१ हजार ६४५ किमतीचा राणीहार, ४ हजाराचे पेंडल, २ हजार ६४४ रुपयांचे कानातले टॉप्स, ६०९ रुपयांची फुले, ३ हजार ८१ रुपयांचे टॉप्स, २ हजार ३० रुपयांची अंगठी, १४ हजार ५१०रुपयांचे नेकलेस, २ हजार ५३१ रुपयांची वेढणी, १५ हजार ६२३ रुपयांची मोहनमाळ, ९९६ रुपयांचे कानातले टॉप, १२ हजार ३२७ रुपयांची गळ्यातील चैन, १० हजार ३६४ रुपयांचा लक्ष्मीहार असा एकुण आकरा लाख ८६ हजार १८९ रुपयांचे दागीने तर त्यांची बहिण सौ. शकुंतला माळी यांचे ४० हजाराचे गंठण, ४० हजारांचा लक्ष्मीहार, २० हजार किमतीच्या दोन अंगठ्या, ३० हजारांची गळ्यातील चैन, ६० हजाराचे गंठण, ४० हजार किमतीची मण्याची माळ, २० हजाराचे कानातले असा अडीच लाख रुपये किमतीचे व दोघींचे मिळून एकुण चौदा लाख ३६ हजार १८९ किमतीचे सोन्याचे दागीने लंपास केले आहेत. या प्रकरणी श्रीमती कस्तुरा सिताराम माळी यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. राउळ हे करीत आहेत.
No comments