शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादन घेण्याबरोबर फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे - गुरुदत्त काळे ; धुमाळवाडी येथे डाळींब व सिताफळ पीक परिसंवाद संपन्न
![]() |
डाळींब व सिताफळ पीक परिसंवादात बोलताना जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे |
कृषी विभागा मार्फत धुमाळवाडी, ता. फलटण येथे डाळींब व सिताफळ पीक परिसंवाद संपन्न
फलटण दि. १२ : धुमाळवाडी, ता. फलटण येथील शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेऊन येथे डाळींबाखालील क्षेत्रात भरीव वाढ करुन दर्जेदार उत्पादन घेतल्याने धुमाळवाडीची ओळख डाळींबाचे गाव म्हणून झाली आहे. निर्माण केल्याचे सांगताना पीक परिसंवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवून पिकांवरील रोग व कीड नियंत्रण करण्यास मदत होईल असा विश्वास केला व शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादन घेण्याबरोबर फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले.
![]() |
डाळींब व सिताफळ पीक परिसंवाद- दीप प्रज्वलन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे |
कृषी विभागा मार्फत धुमाळवाडी, ता. फलटण येथे डाळींब व सिताफळ पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डाळींबावरील ऑईली स्पॉट व कीड नियंत्रण तज्ञ राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूरच्या डॉ. ज्योस्ना शर्मा, भारतीय सिताफळ संघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ कसपटे, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण भास्कराव कोळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी कराड दौलत चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी वाई चंद्रकात गोरड, तहसीलदार फलटण समीर यादव, तालुका कृषि अधिकारी फलटण सागर डांगे, सरपंच योगेश कदम, केंद्रीय रेशीम मंडळ बेंगलोर हुमायू शरीफ, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव विशेष तज्ञ भुषण यादगीरवार, झेड एम बायोस्टेट इंडिया लिमिटेड मुबंईचे संदीप शिंदे, ग्रीन गोल्ड सिड्स औरंगाबादचे माधव धांदे, तंत्र अधिकारी फलटण फिरोज शेख, मंडळ कृषी अधिकारी, अमोल सपकाळ, सतीश निंबाळकर, पूजा दुदुसकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यांच्यासह धुमाळवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कृषि विभागाच्या विविध योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादन घेण्याबरोबर फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे कृषी खात्याच्या माध्यमातून अधिक व दर्जेदार फळ उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग उभारण्यास कृषी खात्याच्या माध्यमातून संपूर्ण मार्गदर्शन व अन्य आवश्यक मदत व सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी दिली.
![]() |
डाळींब व सिताफळ पीक परिसंवादात बोलताना डॉ. ज्योत्स्ना शर्मा |
डाळींबावरील ऑईली स्पॉट व कीड नियंत्रण तज्ञ, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूरच्या डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी डाळिंब पिकांवरील तेलकट डाग व मर रोग प्रसार होण्याची कारणे तसेच कीड नियंत्रण व उपायोजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर येथील वैधानिक सूत्रकृमी नियंत्रण तज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे यांनी डाळींब पिका मध्ये प्रामुख्याने आढळून येणाऱ्या सूत्रकृमी नियंत्रण बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
![]() |
डाळींब व सिताफळ पीक परिसंवाद- दीप प्रज्वलन करताना डॉ. नवनाथ कसपटे |
अखिल भारतीय सिताफळ संघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ कसपटे यांनी न सीताफळ पिकाच्या नवीन जाती परपरागी सिंचन मधून तयार केल्या असून त्यापैकी काही फळावर आहेत, काहींची निरीक्षण चालू असल्याचे सांगताना अशा २५०० सिताफळ जाती निर्माण करण्याचे काम सुरु असल्याचे, तसेच छाटणी पध्दत व कीड रोग नियंत्रण, सिताफळ काढणी व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
तहसीलदार फलटण समीर यादव यांनी ई-पीक पहाणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, फलटण तालुक्यात मोबाईल अप द्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी व नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी तहसीलदार समीर यादव यांनी केले. पोलीस पाटील सौ. पल्लवी पवार यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
![]() |
फळांची पाहणी करताना तहसीलदार फलटण समीर यादव, कृषी सहाय्यक सचिन जाधव |
केंद्रीय रेशीम मंडळ, बेंगलोर डॉ. हुमायू शरीफ यांनी रेशीम शेती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले,
उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्कराव कोळेकर यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर डाळींब व सिताफळ पीक परिसंवाद आयोजन बाबत सविस्तर माहिती दिली. समारोप व आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी फलटण सागर डांगे यांनी केले.
जिल्हा रेशीम कार्यालय, वाईचे रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, सरपंच योगेश कदम, ग्रामपंचायत सदस्य समीर पवार, सदस्या सौ. मनीषा माने, सौ.पल्लवी पवार, सौ. रेखा धुमाळ, सौ. रुपाली जाधव, पोलीस पाटील सौ. पल्लवी पवार, तंटामुक्ती समिती अध्यक्ष पोपट धुमाळ, कृषी पर्यवेक्षक अंकुश इंगळे, सावता टिळेकर, कृषी सहाय्यक सचिन जाधव उपस्थित होते.
धुमाळवाडी गावातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उत्कृष्ट सिताफळ, डाळींब, आवळा फळांचे प्रदर्शन लावण्यात आले होते, तसेच
शेती पूरक व्यवसाय रेशीम शेती, अंडीपुंज पासून ते कोष पर्यंतचे जीवनक्रम माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. डाळींब व सिताफळ फळपीकांमध्ये आंतरमशागत कामे करण्यासाठी आवश्यक विविध औजारे शेतकऱ्यांना माहितीसाठी ठेवण्यात आली होती.
No comments