पालखी मार्गाचे पॅचवर्क झाले नाही तर रस्त्यावर वृक्षारोपण - नगरसेवक अशोक जाधव व सचिन अहिवळे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ सप्टेंबर - फलटण शहरातील मलठण परिसरात असणाऱ्या पालखी मार्गाची दुरवस्था झाली असून, रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत तरी दि. 10 सप्टेंबर 2021 पूर्वी रस्त्याचे पॅचवर्क करावे अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा नगरसेवक अशोक जाधव व सचिन अहिवळे यांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे.
मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण नगर परिषदेतील मलठण परिसरातील सर्व सार्वजनिक शौचालय अवस्था बेकार झाली असून त्यातील भांडी व दरवाजे खराब झालेले आहेत, त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी तसेच हरिबुवा मंदिर ते पुणे पंढरपूर रोड या पालखी मार्गावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत. दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी गणपती स्थापनेच्या आत डांबरी पॅचवर्क करून द्यावे, अन्यथा 10 सप्टेंबर 2021 रोजी, रस्त्यावरल खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचे आंदोलन, मलठण मधील नागरिक व भाजपाचे तर्फे करण्यात येईल असा इशारा नगरसेवक अशोक जाधव व सचिन अहिवळे यांनी दिला.
No comments