सातारा जिल्ह्यात 308 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 1 बाधिताचा मृत्यू
574 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 308 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना (38211), खंडाळा 11 (13913), खटाव 35 (24595), कोरेगांव 21 (21289), माण 45 (17132), महाबळेश्वर 1 (4596), पाटण 2 (9991), फलटण 75(35447), सातारा 68(49846), वाई 10 (15480) व इतर 8 (1945) असे आज अखेर एकूण 242306 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6061 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 574 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने – 1856782
एकूण बाधित – 242306
घरी सोडण्यात आलेले 228917
मृत्यू -6061
उपचारार्थ रुग्ण- 10743
No comments