Breaking News

श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Inauguration of Synthetic Badminton Court at Shrimant Chhatrapati Shahu District Sports Complex by Guardian Minister

खेळाडूंना सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री

    सातारा दि. 18 (जिमाका): राज्यातून गुणवंत खेळाडू निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने क्रीडा संकुलांच्या  माध्यमातून खेळाडुंना पायाभूत सुविधा देण्यावर भर दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

     श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.    कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी  उपस्थित होते.

    साताऱ्यात श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट व्हावे अशी खेळाडूंची असलेली मागणी पूर्ण करण्यात आली आहे.  चांगले खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा संकुलातील खेळाडूंच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

    जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी  सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट तयार करणाऱ्या पथकाचे अभिनंदन करुन क्रीडा संकुलात आणखीन सुविधा वाढविणार असल्याचे सांगितले.

    कार्यक्रमाला क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडू उपस्थित होते.

No comments