सातारा जिल्ह्यात 308 कोरोनाबाधित; एका बाधितांचा मृत्यू
526 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 308 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 11 (9929), कराड 19 (38585), खंडाळा 15 (14011), खटाव 48 (25119), कोरेगांव 43 (21595), माण 31 (17450), महाबळेश्वर २ (4645), पाटण 6 (10142), फलटण ५५ (36271), सातारा 63 (50603), वाई 9 (15621) व इतर ६ (2022) असे आज अखेर एकूण 245993 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6022 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 526 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण बाधित – 245993
घरी सोडण्यात आलेले – 235823
मृत्यू –6034
उपचारार्थ रुग्ण– 7098

No comments