Breaking News

महिलेस मारहाण ; मलवडी येथील तिघांवर गुन्हा

Beating women; Crime against three in Malwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ सप्टेंबर - जुन्या भांडणाच्या कारणावरून मलवडी ता. फलटण येथील महिलेस  शिवीगाळ करून, दगड फेकून मारला व  लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी  दिल्याप्रकरणी मलवडी ता. फलटण येथील तीन जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,  दि.17/9/2021राेजी दु. 1.00 वाजण्याच्या  सुमारास मौजे मलवडी गावचे हद्दीत सरकारी बिल्डिंग येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून  १) भूपती बाबूराव गायकवाड यांनी फिर्यादी सौ. सुवर्णा महेंद्र गायकवाड यांना शिवीगाळ करून दमदाटी केली व त्यांच्या कपाळावर दगड फेकून मारून,  कपाळावर दुखापत केली आहे तर २) लीना भूपती गायकवाड व ३) प्रज्वल भूपती गायकवाड यांनी सुवर्णा महेंद्र गायकवाड यांना  लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद सौ. सुवर्णा महेंद्र गायकवाड रा. मलवडी ता. फलटण यांनी दिली आहे.

    अधिक तपास पोलीस नाईक टी.जी.काळेल हे करीत आहेत.

No comments