गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या संशयितास अटक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ सप्टेंबर - वाठार निंबाळकर ता. फलटण गावच्या हद्दीत अंधाराचा फायदा घेऊन गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या संशयितास पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी चोरी करण्याच्या हत्यारासह अटक केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर २०२१ राेजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास फलटण सातारा रोडवर पेट्रोलिंग करत असताना, मौजे वाठार निंबाळकर गावचे हद्दीत हॉटेल ऋषिकेश शेजारी पंक्चर काढण्याच्या दुकानाच्या आडोशाला, अंधाराचा फायदा घेऊन, दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेला संशयित कुंडलिक रघुनाथ जाधव रा. मुळीकवाडी ता. फलटण हा सापडला आहे. त्याच्याकडे चोरी करण्याची हत्यारे मिळून आली आहेत.
अधिक तपास महिला पोलीस हवालदार खाडे या करीत आहेत.

No comments