फलटण, सातारा, वाई, महाबळेश्वर, कराड तालुक्यातील रास्त भाव दुकानांच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा दि.27(जिमाका): नवीन शिधावाटपदुकान मंजूर करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करुन दिलेला आहे. शासनाच्या प्राथम्यक्रमानुसार नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिला स्वयंसहायता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.
महाबळेश्वर, तालुक्यातील रास्त भाव दुकांनाची संख्या 1 पाचगणी आहे. कराड, तालुक्यातील रास्त भाव दुकांनाची संख्या 4 मंगळवार पेठ,शनिवार पेठ,गुरुवार पेठ, सोमवार पेठ आहे. वाई, तालुक्यातील रास्त भाव दुकांनाची संख्या 1 रामडोहआळी आहे. सातारा, तालुक्यातील रास्त भाव दुकांनाची संख्या 15 बुधवारनाका, देशमुख कॉलनी, सोमवार पेठ, मार्केट यार्ड, प्रतापगंज पेठ,भावनी पेठ, विलापूर फॉरेस्ट कॉलनी , सदरबझार, सदरबझार, सोमवार पेठ, गोळीबार मैदान,करंजे, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, पंताचा गोट आहे. फलटण, तालुक्यातील रास्त भाव दुकांनाची संख्या 1 फलटण आहे.
परवान्यांसाठी अर्ज करण्याची मुदत 27 ऑक्टोबर2021 पर्यंत आहे. अर्ज संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे विहित नमुन्यात सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांच्याशी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा शाखेस अथवा 02162-234840 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी, स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.
No comments