लुटमारी ; दुधेबावी घाटात दुचाकी अडवून दोघांना लुटले
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ८ ऑगस्ट - दुधेबावी फलटण गावच्या हद्दीत घाटामध्ये, ७ ते ८ इसमांनी, दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना आडवून, काठी व दगडांच्या साह्याने हल्ला करत त्यांच्याकडे असणारी रोख रक्कम व मोबाईल लुटून नेला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १.४५ वा चे सुमारास, अक्षय आनंदराव राजगे रा.गोखीवरे अब्रोसिया रेसीडन्सी वसई जि.पालघर मुळ रा. पिंपरी ता. माण हे ॲक्टीवा गाडीवरून त्यांच्या मूळ गावी जात असताना, मौजे दुधेबावी ता. फलटण गावचे हृददीत, दुधेबावी घाटात म्हसोबा मंदीराच्या पुढील वळणावर, अक्षय राजगे यांच्या ॲक्टीवा गाडीसमोर २० ते २२ वयोगटातील ७ ते ८ जण हातात काठ्या घेवुन पळत आले, व गाडी थांबवुन अक्षय राजगे व त्यांच्या पाठमागे बसलेला मित्र यांच्यावर दगडफेक करुन, त्यांच्या डोक्यात असलेल्या हेल्मेटवर काठीने जोरात मारहाण करुन, त्यांना थांबवुन त्यांच्याकडील रोख रक्कम व आयफोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन काढुन घेतला. पंधरा हजार रूपये रोख व ॲपल कंपनीचा आयफोन असा ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी हिसकावून नेला असल्याची फिर्याद अक्षय राजगे यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत हे करीत आहेत.

No comments