Breaking News

उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांचे दुःखद निधन

Nandkumar Bhoite passed away

    फलटण दि. २७ ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा)  - फलटण नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे यांचे लेह लडाखच्या दौऱ्यावर असताना आज दि. २७ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले असून, त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय  क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.

    फलटण  नगर परिषदेमध्ये गेली 35 वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे, नागरिकांच्या अडचणींना  धावून येणारेगरिबांचा कैवारी, विकास कामांचा डोंगर उभा करणारे कार्यक्षम नगरसेवक नंदकुमार भोईटे यांच्या निधनाची बातमी पसरताच फलटण सह तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे, अद्यापही निधनाची बातमी खरी नसावी आणि ती खरी असूच नये अश्या भावना सोशल मीडियावर पोस्ट होताना दिसत आहेत. 

    दरम्यान उद्या फलटण येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

No comments