Breaking News

महाराष्ट्र राज्य लॉटरीची महाराष्ट्र गणेशलक्ष्मी रक्षा बंधन मासिक सोडतीची बक्षिसरचना

Maharashtra State Lottery Maharashtra Ganesh Lakshmi Raksha Bandhan Monthly Draw Prize Structure

    मुंबई  - वित्त विभागाच्या दि. 22 जुलै, 2021 च्या शासन परिपत्रकान्वये महाराष्ट्र राज्य लॉटरीची ‘महाराष्ट्र गणेशलक्ष्मी अक्षय तृतीया’ या सोडतीची बक्षिस रचना व कार्यपद्धतीस मान्यता देण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र गणेशलक्ष्मी अक्षय तृतीया’ या सोडतीच्या नावामध्ये बदल करुन ‘महाराष्ट्र गणेशलक्ष्मी रक्षा बंधन’ या नावाने  दि. 25 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी, 4.00 वाजता काढण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    ‘महाराष्ट्र गणेशलक्ष्मी रक्षा बंधन’ या नावाने काढण्यात येणाऱ्या मासिक सोडतीची बक्षिस संरचना व कार्यपद्धती परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे परिपत्रक वित्त विभागाच्यावतीने काढण्यात आले आहे.

No comments