अतिवृष्टी व पूरग्रस्तांना कांबळेश्वर, ता.बारामती ग्रामस्थांनी दिले लाखोंचे दान
![]() |
युवकमित्र ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या कडे धनादेश सुपूर्द करताना कांबळेश्वर ग्रामस्थ |
फलटण - अतिवृष्टी आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या लोकांसाठी कांबळेश्वर, ता. बारामती येथील सामाजिक व व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या युवकांनी मदतीचा हात मागितला आणि क्षणाचा विचार न करता गावातील ग्रामस्थांनी भरघोस अशी १ लक्ष रुपयांची आर्थिक मदत केली.
ह. भ. प. युवकमित्र बंडा तात्या कराडकर यांनी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक गावांचे पुनर्वसनासाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कांबळेश्वर येथील ग्रामस्थ आणि युवकांनी मदत गोळा करायला सुरुवात केली आणि बघता बघता रोख रक्कम १०११११/- एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये व धान्य गोळा करुन युवकमित्र ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या कडे ही मदत पूरग्रस्तांना पाठविण्यासाठी जमा करण्यात आली. यावेळी बंडा तात्या कराडकर यांनी कांबळेश्वर ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. या उपक्रमाला ग्रामस्थ व तरुणांनी केलेली साथ प्रेरणादायी असून आपण स्वतः कांबळेश्वर येथे जाऊन सर्वांना धन्यवाद देणार असल्याचे ह भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी जाहीर केले आहे. आज पंचक्रोशीत कांबळेश्वर गावचे कौतुक होत आहे. आम्हा युवकांना कांबळेश्वर गावाचा आणि ग्रामस्थांचा सार्थ अभिमान असल्याचे तरुणांनी सांगितले.
No comments