अपहरण करून होळ ता. फलटण येथे युवकाचा खून
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ ऑगस्ट - मौजे होळ ता.फलटण गावच्या हददीत आपटे यांचे शेतामध्ये, अपहरीत शकील अकबर शेख हा मयत असलेल्या स्थितीत मिळुन आला, असुन त्याला कोणीतरी अज्ञात 3 व्यक्तींनी पळवुन नेवून, त्याचा खुन केला आहे. दरम्यान फलटण ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास अटक केली आहे
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे जिती ता.फलटण गावचे हृददीत जिंती पुल येथून, ता.१६/८/२०२१ रोजी रात्री ९.०० वाजणेच्या सुमारास, शकील अकबर शेख वय २१ वर्षे रा विकासनगर जिंती ता.फलटण व त्याचा मित्र विकास रघुनाथ आवटे रा. जिंती ता.फलटण हे त्यांची बजाज बॉक्सर मोटार सायकल क्रमांक एम एच ११ एस ४४३४ वरती विकासनगर येथुन कपडे आणणेसाठी रणवरे वस्ती जिंती येथे गेले होते. ते कपडे घेवुन परत घरी येत असताना, अज्ञात ३ लोकांनी त्यांच्या मोटार सायकलला गाडी आडवी मारुन, त्यांची मोटार सायकल अडवुन, शकील यास त्यांचे मोटार सायकलच्या मधल्या सिटवर बसवुन त्याची मोटार सायकल घेवुन, शकील यास ३ अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याची फिर्याद खुशी शकील शेख यांनी दिली होती.
सदर गुन्हयाचे अनुशंगाने पोलिसांनी अपहरीत शकील याचा शोध घेतला असताना, मौजे होळ ता.फलटण गावचे हददीत आपटे यांच्या शेतामध्ये यातील अपहरीत शकील अकबर शेख हा मयत असलेल्या स्थितीत मिळुन आला असुन, त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी पळवुन नेवून, त्याचा खुन केला असल्याचे निदर्शनास आले.
फलटण ग्रामीण पोलिसांनी सदर गुन्हयाचे अनुशंगाने एका संशयीतास ताब्यात घेतले असुन, तपास चालु आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.
No comments