Breaking News

शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवावी - तहसीलदार समीर यादव

Farmers should report e-crop survey through mobile app - Tehsildar Sameer Yadav

    फलटण दि. १५ ऑगस्ट : ई-पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत शेतक-यांनी ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपव्दारे ॲनरॉईड मोबाईल मध्ये रजिस्ट्रेशन करुन, आपल्या मालकीच्या शेतजमिनीची पीक पाहणी स्वतः ॲपवर नोंदवावयाची आहे. तरी शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे  नोंदवावी असे आवाहन फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी पत्रकाद्वारे तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

    महसूल व वन विभागाकडील जमीन २०१८/प्र. क्र. ९२ / (भाग १) / ज-१अ मुंबई दि. ३० जुलै २०२१ या शासन निर्णयाद्वारे महसूल विभागाने ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करणेबाबत दिशा निर्देश दिले असून त्याप्रमाणे दि. १५ ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यात अंमलबजावणी सुरु होत असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले.

    या संबंधीच्या मोबाईल अप वर पीक पाहणी नोंदवून पिकाचे फोटो अपलोड करावयाचे आहेत. याबाबत प्रत्येक गावात तलाठी, मंडलाधिकारी यांचे मार्फत शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम सुरु असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदर माहिती घेऊन या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार समीर यादव यांनी केले आहे.

    पीक पाहणीचे डेमो अप साठी पुढील लिंक उपलब्ध आहे, त्याद्वारे माहिती घेता येईल असे तहसीलदार फलटण यांनी कळविले आहे. http://epeek.mahabhumi.gov.in/demo/app-download

No comments