Breaking News

खोट्या गुन्ह्यात अडकल्या प्रकरणी चौकशीची मागणी ; घंटानाद करून निषेध

Demand an inquiry into a case involving a false crime

    फलटण दि. 22 ऑगस्ट 2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) -   तक्रार देण्यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गेलेल्या आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश आवळे व अन्य पाच भीमसैनिक यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करून या घटनेचा वंचित बहुजन आघाडी, आजाद समाज पार्टी, लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने घंटानाद करून जाहीर निषेध करण्यात आला. 

    फलटण येथील तहसीलदार कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी, आजाद समाज पार्टी, लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने  भीमसैनिकांवरील अन्यायासंदर्भात घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

    फलटण येथील एका पीडित कुटुंबाबाबत झालेल्या अन्यायाबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी काही भीमसैनिक गेले असता फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी  मंगेश आवळे व इतरांसोबत गेलेल्या भीमसैनिकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केला असे भासवून, तसेच पोलीसांना शिवीगाळ केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आजाद समाज पार्टीचे प. महाराष्ट्र अध्यक्ष सनी काकडे यांनी केली. यावेळी वंचितचे सुभाष गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments